नाशिक संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर रेकॉर्ड ब्रेक वाहतूक कोंडी

Foto
वैजापूर 

शुभम लुटे 

 वैजापूर शहरातील नाशिक संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर 12 ऑक्टोबर रोजी  रेकॉर्ड ब्रेक वाहतूक कोंडी झाली. येवला नाका येथे वाहतूक पोलीस गैरहजर असल्याने व बॅरिकेट्स लावलेले नसल्याने व पुरणगाव रस्त्यावर वाहतूक न वळवल्याने अवजड वाहने वैजापूर शहरात घुसल्याने वैजापूर शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते vp कॉलेजपर्यंत  अवजड वाहनांच्या रांगास रांगा बघावयास मिळाल्या. 
 त्यातच रविवारची वैजापूरची भाजी मंडई रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीस अजून अडथळा निर्माण झाला.  वाहतूक पोलिसांनी उशिरा साडेदहा वाजेनंतर  शहरात येणारी वाहतूक पुरनगाव रोड मार्गे नागपूर मुंबई हायवे वर वळवल्याने  वाहतूक सुरळीत झाली.  वैजापूर पोलिसांनी 24 तास येवला नाका येथे आपले दोन कर्मचारी नियुक्त करून अवजड वाहने  नागपूर मुंबई हायवेवर वळवावीत व नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भाजी मंडई जिल्हा परिषद मैदान येथे भरवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.